वनोजाचा लाचखोर तलाठी जेरबंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 01:06 IST2017-09-19T01:05:42+5:302017-09-19T01:06:21+5:30

Vanoj's bribe Talathi jerband! | वनोजाचा लाचखोर तलाठी जेरबंद!

वनोजाचा लाचखोर तलाठी जेरबंद!

ठळक मुद्देतलाठी सतीश  गबुराव सडके एक हजार रुपयांची  लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाने अटक केली


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: तालुक्यातील वनोजा येथे कार्यरत तलाठी सतीश  गबुराव सडके यास तक्रारदाराकडून एक हजार रुपयांची  लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाने रिठद येथील  कार्यालयात सोमवारी अटक केली.
याबाबत प्राप्त माहितीनुसार, तक्रारदाराने ग्राम वनोजा येथील  गट नं. ९७ मधील शेती विकत घेऊन खरेदी केली. दरम्यान,  ऑनलाइन खरेदी परस्पर महसूल विभागाकडे गेल्याने  तक्रारदाराने त्यांच्या गावचे तलाठी सतीश सडके यास भेटून  खरेदी केलेल्या शेतीची दप्तरी नोंद करण्यासाठी सातबारा  फेरफार देण्याची मागणी केली; मात्र या कामासाठी तलाठी  सडके याने दोन हजार रुपयांची लाच मागितली, अशी तक्रार  लाचलुचपत विभागाकडे सादर झाली. १४ सप्टेंबरला त्या तील एक हजार रुपये स्वीकारले आणि उर्वरित रक्कम १८  सप्टेंबरला देण्याचे ठरले. त्यानुसार, सापळा रचून तलाठी  सडके यास लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. 

Web Title: Vanoj's bribe Talathi jerband!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.