सहारा सुपर सर्विसेसच्या सहकार्याने लसीकरण शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:38 IST2021-08-01T04:38:38+5:302021-08-01T04:38:38+5:30
सहारा सुपर सर्विसेस व उपजिल्हा रुग्णालयाच्यावतीने नागपूर हायवे रस्त्यावर पंपावर लसीकरण शिबिर घेण्यात आले. या लसीकरण शिबिराचे उदघाटन तहसीलदार ...

सहारा सुपर सर्विसेसच्या सहकार्याने लसीकरण शिबिर
सहारा सुपर सर्विसेस व उपजिल्हा रुग्णालयाच्यावतीने नागपूर हायवे रस्त्यावर पंपावर लसीकरण शिबिर घेण्यात आले. या लसीकरण शिबिराचे उदघाटन तहसीलदार धीरज मांजरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते म्हणाले की, ज्यांनी लसीकरण केले नाही अशांनी लसीकरण करून घेणे अत्यंत महत्त्वाचे असून आपण आपल्या परिवाराची जबाबदारी पार पाडावी व प्रशासनाला सहकार्य करावे. यावेळी नायब तहसीलदार हरणे, भाजपाचे शहर प्रमुख ललित चांडक, साहारा सर्विसचे संचालक तौसिफ मामदानी, यामिन मामदानी उपजिल्हा येथील कोविड इन्चार्ज सावन कोल्हे, विनोद चव्हाण, कुमारी प्राजक्ता गायकवाड, नितीन जाधव, रमेश देशमुख उपस्थित होते. लसीकरण शिबिर यशस्वी करण्यासाठी आसिफ खान समीर, शेख शब्बीर भाई परशुवाले, अमित संगेवार, संदीप कथलकर उपस्थित होते.