मानोरा येथे पहिल्या दिवशी १०४ जणांना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:37 IST2021-04-05T04:37:10+5:302021-04-05T04:37:10+5:30
नगरपंचायतचे मुख्याधिकारी नीलेश गायकवाड यांनी चोख नियोजन करून नगरपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका व आशा सेविकांना एकत्रित करून त्यांचे पथक ...

मानोरा येथे पहिल्या दिवशी १०४ जणांना लसीकरण
नगरपंचायतचे मुख्याधिकारी नीलेश गायकवाड यांनी चोख नियोजन करून नगरपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका व आशा सेविकांना एकत्रित करून त्यांचे पथक तयार केले. शहरातील प्रत्येक घरापर्यंत जाऊन सदर पथक ४५ वर्षांवरील नागरिकांना कोविड लसीकरण करण्याकरिता प्रोत्साहन देत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये स्वतः मुख्याधिकारी रस्त्यावर उतरून नागरिकांना लसीकरण करण्यासाठी प्रेरित करत आहेत. शहरातील नागरिकांना ग्रामीण रुग्णालयात जाण्याकरिता नगरपंचायतने ऑटोची व्यवस्थादेखील केली आहे. ग्रामीण रुग्णालय खूप दूर असल्यामुळे नागरिक तेथे जाण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून आल्यामुळे मुख्याधिकारी यांनी पुढाकार घेऊन नागरिकांच्या सोयीसाठी त्यांच्याच वाॅर्डमध्ये लसीकरण करण्याकरिता रहेमानिया उर्दू शाळेमध्ये कॅम्प आयोजित केला. नगरपंचायतच्या वतीने घेण्यात आलेल्या लसीकरण कॅम्पमध्ये पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. १०४ व्यक्तींचे लसीकरण झाले. या कॅम्पचे उद्घाटन नगरपंचायतच्या माजी अध्यक्ष बरखा बेग, वहिदोद्दीन शेख यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अहमद बेग, अहफाज शाह, निसार शहा व गावातील इतर नागरिक, नगरपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका उपस्थित होत्या.