अडाण पात्रात टरबुज शेतीचा प्रयोग, नदीकाठावरच विक्री: बुरशी रोगामुळे यंदा उत्पादनात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 15:15 IST2018-04-18T15:15:56+5:302018-04-18T15:15:56+5:30
मानोरा तालुक्यातील कारंजा-मानोरा मार्गावर इंझोरीनजिक असलेल्या अडाण नदीच्या पात्रात परजिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून टरबुजाची शेती करण्यात येत आहे.

अडाण पात्रात टरबुज शेतीचा प्रयोग, नदीकाठावरच विक्री: बुरशी रोगामुळे यंदा उत्पादनात घट
इंझोरी: मानोरा तालुक्यातील कारंजा-मानोरा मार्गावर इंझोरीनजिक असलेल्या अडाण नदीच्या पात्रात परजिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून टरबुजाची शेती करण्यात येत आहे. या प्रयोगामुळे त्यांना दरवर्षी भरघोस उत्पन्नही मिळते; परंतु यंदा मात्र टरबुजावर आलेल्या बुरशीजन्य रोगामुळे त्यांच्या उत्पादनात घट येत असल्याचे दिसत आहे.
मानोरा तालुक्यातून वाहणाऱ्या अडाण नदीच्या पात्रात बुडीत क्षेत्रात परजिल्ह्यातील शेतकरी टरबूज आणि खरबुजाची शेती करतात. पाणथळीच्या आणि रेताड जागेत हे पीक चांगले येते. त्यामुळेच या शेतकºयांना गेल्या काही वर्षांत या प्रयोगातून भरघोस उत्पन्नही मिळाले. विशेष म्हणजे हे शेतकरी पिक लेल्या टरबुज आणि खरबुजांपैकी ३० टक्के माल हा अडाण नदीवर बांधण्यात आलेल्या पुलानजिकच बसून विकत असतात. त्यामुळे त्यांना अधिक फायदाही होतो. त्यांच्या या प्रयोगामुळे परिसरातील शेतमजुरांनाही उन्हाळ्यांच्या दिवसात तीन ते चार महिने रोजगारही उपलब्ध होतो. एकंदरीत हा प्रयोग शेतकरी आणि शेतमजुरांसाठी उपयुक्त ठरत आहे. यंदाही या ठिकाणी याच शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात टरबूज आणि खरबुजाची लागवड केली आहे. सुरुवातीला या पिकातून शेतकºयांना चांगले उत्पादन मिळाले; परंतु आता या पिकांवर बुरशीचा रोग आल्याने फळांचा आकार लहान होत असून, वेलींना फ ळधारणाही कमी झाली आहे. त्यामुळे या शेतकºयांचे यंदा मात्र नुकसान होण्याची भिती निर्माण झाली आहे.