महाराष्ट्राच्या राजकारणात पैसा आणि धमकीतंत्राचा वापर
By Admin | Updated: October 10, 2014 23:50 IST2014-10-10T23:07:49+5:302014-10-10T23:50:44+5:30
संग्रामपूर येथील जाहीर सभेत केंद्रीय मंत्री उमा भारती यांचा राकाँ आणि शिवसेनेवर आरोप.

महाराष्ट्राच्या राजकारणात पैसा आणि धमकीतंत्राचा वापर
संग्रामपूर (बुलडाणा) : महाराष्ट्राच्या राजकारणात पैसा आणि धमक्यांचा वापर सर्रास केला जातो. राष्ट्रवादी काँग्रेस केवळ पैशाच्या भरवश्यावर निवडणूक लढविते, तर शिवसेना धमक्यांचा वापर करून आतापर्यत राजकारण करीत आली आहे, असा थेट आरोप केंद्रीय जलसंधारण मंत्री उमा भारती यांनी शुक्रवारी जाहीर सभेत केला.
जळगाव जामोद मतदारसंघाचे भाजप उमेदवार डॉ.संजय कुटे यांच्या प्रचारार्थ वरवट बकाल येथे आयोजित केलेल्या सभेत त्या बोलत होत्या. युती आणि आघाड्यांचे राजकारण संपवून, भाजपला पूर्ण बहुमत देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. सत्ता स्थापनेसाठी एखाद्या पक्षाचे सर्मथन घेतले, तर त्या पक्षाला जावयाप्रमाणे सांभाळावे लागते. त्याचे नखरे सांभाळावे लागतात. त्याचा परिणाम विकास कामांवर होतो. महाराष्ट्राच्या राजकारणात अशी स्थिती यापुढे आणू नका, असे आवाहन त्यांनी उपस् िथतांना केले. एकेकाळी फायर ब्रँड म्हणून माझी ओळख होती; आता मात्र वॉटर ब्रँड म्हणून ओळ ख निर्माण करणार असल्याचे सांगत, त्यांनी देशातील सर्व पाणीपुरवठा योजना मोदी सरकारच्या काळात पूर्ण होतील, अशी ग्वाही दिली. यावेळी व्यासपिठावर भाजपचे स्थानिक नेते उपस्थित होते.
* उध्दव ठाकरेंना इतिहास माहित नाही : खडसे
शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी दिल्लीवरून अफजलखानाची फौज आली अशी टीका भाजपसंदर्भात केली होती. या वक्तव्याचा समाचार एकनाथ खडसे यांनी घेतला. उध्दव ठाकरेंना इ ितहास माहित नाही. अफजलखान दिल्लीवरून नाही, तर विजापूरवरून आला होता. त्यांना मुळातच अभ्यास करण्याची सवय नाही. त्यामुळे अशी अर्धवट विधानं करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सेनेकडून केला जात असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला.