अप्पर मुख्य सचिवांनी घेतला ‘रोहयो ’च्या कामांचा आढावा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:15 IST2021-03-13T05:15:07+5:302021-03-13T05:15:07+5:30

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आयुक्त शांतून गोयल, जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश ...

Upper Chief Secretary reviews Rohyo's work | अप्पर मुख्य सचिवांनी घेतला ‘रोहयो ’च्या कामांचा आढावा !

अप्पर मुख्य सचिवांनी घेतला ‘रोहयो ’च्या कामांचा आढावा !

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आयुक्त शांतून गोयल, जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, उपजिल्हाधिकारी (रोहयो) शैलेश हिंगे यांच्यासह सामाजिक वनीकरण आणि वनविभागाचे अधिकारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे या सभेत सहभागी झाले होते.

अप्पर मुख्य सचिव नंद कुमार म्हणाले, सर्व ग्रामपंचायतींना व संबंधित यंत्रणांनी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेची कामे सुरु करून मजुरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. रोहयोची अपूर्ण कामे असतील, तेथे उपरोक्त कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने करावी. तसेच मोठ्या प्रमाणात नवीन कामे हाती घेऊन ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत. जिल्ह्यात रोहयोची जास्तीत जास्त कामे सुरु होतील, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी नियोजनबद्ध प्रयत्न करावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

बॉक्स

मजुरांनी कामाची मागणी नोंदवावी !

ग्रामीण भागातील जॉबकार्ड धारक अकुशल मजुरांनी काम मागणीसाठी लेखी अर्ज ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामसेवक, ग्राम रोजगार सेवक, पंचायत समिती अथवा तहसील कार्यालय यापैकी कोणत्याही एका ठिकाणी भरून द्यावा. या अर्जासोबत बँक पासबुकची व आधारकार्डची छायांकित प्रत जोडावी. जॉबकार्ड नसलेल्या अकुशल मजुरांनी ग्रामपंचायत, पंचायत समिती अथवा तहसील कार्यालयाकडे तत्काळ जॉबकार्डची मागणी नोंदवावी, असे आवाहन शण्मुगराजन एस. यांनी केले.

Web Title: Upper Chief Secretary reviews Rohyo's work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.