शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नवीन धोरणानुसार ४५ हजार पात्र शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 13:34 IST

४५ हजार शेतकºयांच्या याद्या आतापर्यंत अपलोड करण्यात आल्या असून एकूण शेतकºयांचा आकडा १.५२ लाखांवर पोहचला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत आधी २ हेक्टरपर्यंतची मर्यादा ठरवून शासनाने शेतकऱ्यांना तीन टप्प्यात प्रतिवर्ष सहा हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेतला होता. त्यात सुधारणा करित नवे धोरण आखून २ हेक्टरपेक्षा अधिक जमीन धारण करणाºया शेतकºयांनाही योजनेचा लाभ देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार ४५ हजार शेतकºयांच्या याद्या आतापर्यंत अपलोड करण्यात आल्या असून एकूण शेतकºयांचा आकडा १.५२ लाखांवर पोहचला आहे.शेतकºयांना निश्चित उत्पन्न मिळावे, या उद्देशाने शासनाने २ हेक्टरपेक्षा कमी जमीन असणाºया पात्र शेतकºयांच्या बँक खात्यात तीन टप्प्यात प्रत्येकी २ हजार रुपये याप्रमाणे वर्षभरात ६ हजार रुपये पात्र शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला. त्याची जिल्हा प्रशासनाने प्रभावी अंमलबजावणी करून १ लाख ७ हजार पात्र शेतकºयांच्या याद्या आधीच शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर अपलोड केल्या होत्या. त्यातील बहुतांश शेतकºयांच्या बँक खात्यात पहिल्या व दुसºया टप्प्याची रक्कमही जमा झाली. यादरम्यान शासनाने २ हेक्टरपेक्षा अधिक जमीन असणाºया शेतकºयांनाही योजनेचा लाभ दिला जाणार असल्याचे धोरण जाहीर केले. त्यानुषंगाने ४५ हजार शेतकºयांच्या याद्या अपलोड करण्यात आल्या असून संबंधित शेतकºयांना लवकरच प्रत्यक्ष लाभ देण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.११, १२ जुलै रोजी ग्रामपंचायत स्तरावर विशेष मोहीमप्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत संयुक्त व सामाईक खातेदारांपैकी पात्र, अपात्र कुटुंबांची, तसेच उर्वरित संकलित न झालेल्या लाभार्थ्यांची माहिती गोळा करण्यासाठी ११ व १२ जुलै रोजी ग्रामपंचायत स्तरावर विशेष मोहीम राबविली जाणार आहे. तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांमार्फत माहिती संकलित केली जाणार असून ज्या लाभार्थ्यांनी अद्यापपर्यंत माहिती दिलेली नाही, अशांनी आधारकार्डची झेरॉक्स प्रत व बँक खाते पुस्तकाच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत गावचे तलाठी किंवा ग्रामसेवक, कृृषी सहाय्यक यांच्याकडे द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :washimवाशिमPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाFarmerशेतकरी