रस्त्याच्या कामास सुरुवात न केल्यास उपाेषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:30 IST2021-05-29T04:30:15+5:302021-05-29T04:30:15+5:30
रिसाेड : येथील सिव्हील लाईन रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली असून, या रस्त्याचे काम त्वरित सुरू न केल्यास उपाेषण करण्याचा ...

रस्त्याच्या कामास सुरुवात न केल्यास उपाेषण
रिसाेड : येथील सिव्हील लाईन रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली असून, या रस्त्याचे काम त्वरित सुरू न केल्यास उपाेषण करण्याचा इशारा मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्यावतीने देण्यात आला आहे.
केंद्रीय मंत्री तथा अकोला लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय धोत्रे यांचे प्रतिनिधी म्हणून आमदार रणवीर सावरकर हे रिसोड येथे विश्रामगृहावर २८ मे राेजी आले हाेते. याची माहिती संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना मिळताच त्यांनी विश्रामगृहावर धडक देऊन रस्ता काम करा, अन्यथा उपाेषण करणार असल्याचे इशाऱ्याचे निवेदन दिले. निवेदनामध्ये शासनाने येत्या १० जूनच्या अगोदर कामाला सुरुवात करा, अन्यथा ११ जून रोजी काही पदाधिकारी सिव्हिल लाईन येथे आमरण उपोषणाला सुरुवात करतील असे नमूद केले आहे. निवेदनावर मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष रमेश पाटील सदार, तसेच जिल्हा कार्याध्यक्ष विनोद पाटील खडसे, हराळ सर्कल अध्यक्ष शालिक भाऊ पवार, रिसोड शहर अध्यक्ष भारत भाऊ भगत व अतुल म्हस्के यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.