अवकाळी पावसाने रिसोड तालुक्यात नुकसान
By Admin | Updated: June 4, 2014 01:23 IST2014-06-03T20:05:30+5:302014-06-04T01:23:20+5:30
तुफान वारा आकाशात गडगडाट, जोरदार पावसाच्या सरी पडल्या आहेत.

अवकाळी पावसाने रिसोड तालुक्यात नुकसान
रिसोड : मान्सूनने यापूर्वीच वादळी अवकाळी पावसाने शहरासह तालुक्यात हजेरी लावली आहे. दि. १ जूनच्या रात्री ९ वाजताच्या दरम्यान तुफान वारा आकाशात गडगडाट, जोरदार पावसाच्या सरी पडल्या आहेत. वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. यामध्ये शहरातील वीरशैव लिंगायत स्मशान भूमीजवळील दुकानाची पत्रे उडाली तसेच लोणी रोडवरील वनउद्यानाजवळील दुकानाचीसुद्धा मोडतोड होऊन कमालीचे नुकसान झाले आहे. येथील भाजी मंडईतील दुकानाची अवस्था बिकट झाली. रिसोड-वाशिम रस्त्यावरील बाभळीची अनेक झाडे मुळासह उखडून पडली आहेत. सवड गावात वादळामुळे अनेक घरांच्या भिंती पडल्या. घरांवरील टीनपत्र उडून गेल्याने घरात पावसाचे पाणी साचले. पळसखेड गावातसुद्धा नुकसान झाले आहे. विद्युत तारासुद्धा तुटल्या आहेत.