विनापरवानगी तोडली सागवानची झाडे

By Admin | Updated: February 11, 2015 00:55 IST2015-02-11T00:55:19+5:302015-02-11T00:55:19+5:30

शेतक-यांची जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार.

Unprivileged tree shrubs | विनापरवानगी तोडली सागवानची झाडे

विनापरवानगी तोडली सागवानची झाडे

वाशिम : वनविभागाने कोणत्याही प्रकारची परवानगी न देता माझ्या शेतातील १00 सागवानच्या झाडे तोडल्याची तक्रार धमधमी येथील महादेव काशिराम डाखोरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे ६ फेब्रुवारी रोजी केली.
डाखोरे यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले की, माझे शेतामधून गट नं. २३ मधील शेतातील विनापरवानगी सागवान झाडे १00 नग तोडली. या प्रकरणाची चौकशी करावी व मला न्याय देण्यात यावा, असे म्हटले आहे. वनविभागाने लाकडे तोडून माझ्या गावाच्या बाजूला गंजी मारली आहे. तसेच माझ्या या शेताला लागून बबन भुजंगराव यांच्या शेताचा परवाना काढून वनविभागाने भुजंगरावच्या व माझ्या शेतामधील सागवान झाडे तोडून शिक्के मारून गावाच्या शेजारी जमा करुन ठेवली. मी शेतामध्ये गेलो असता सदर बाब माझ्या निदर्शनास आली. याबाबत वनविभागाचे अधिकारी यांना विचारणा केली असता, माझ्या शेतामधील सागवान झाडे का तोडली, त्यांनी मला काही न सांगता तुमचे पैसे मिळून जातील. नाही ऐकत असाल, तर तुमच्यावर कारवाई करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणाची तात्काळ चौकशी करुन मला न्याय देण्यात यावा, अशी मागणी डाखोरे यांनी निवेदनातून केली आहे. यासंदर्भात वनविभागाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला अस ता, होऊ शकला नाही.

Web Title: Unprivileged tree shrubs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.