अज्ञात इसमाने फोडल्या वाहनांच्या काचा!

By Admin | Updated: March 18, 2016 02:02 IST2016-03-18T02:02:56+5:302016-03-18T02:02:56+5:30

विकृत मानसिकतेतून केले १0 ते १५ वाहनांचे नुकसान.

Unidentified flying vehicles uncle! | अज्ञात इसमाने फोडल्या वाहनांच्या काचा!

अज्ञात इसमाने फोडल्या वाहनांच्या काचा!

वाशिम: विकृत मानसिकता असलेल्या अज्ञात इसमाने वाशिम शहरातील लाखाळा व सिव्हिल लाइन परिसरात घरासमोर उभ्या असलेल्या अंदाजे १0 ते १५ वाहनांची काचा फोडल्याची घटना गुरुवारला सकाळी उघडकीस आली.
वाशिम शहरातील लाखाळा, जानकी नगर, माउली नगर, सिव्हिल लाईन, आययूडीपी कॉलनी या परिसरात घरासमोर असलेल्या कारच्या काचा अज्ञात इसमाने फोडून हजारो रुपयांचे नुकसान केले. या घटनेची वाशिम शहरात वार्‍यासारखी वार्ता पसरली. या घटनेमुळे वाशिम शहरातील नागरिक धास्तावले असून, आपल्या कारची रात्री सुरक्षा कशी करावी, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा झाला आहे. पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त घालण्याची मागणी यानिमित्ताने समोर येत आहे. या घटनेमध्ये जानकी नगरमधील नीलेश सोमाणी, एन.के. ड्रायव्हिंग स्कूलची कार यासह अनेक नागरिकांच्या वाहनांचे नुकसान झाले आहे. वृत्त लिहेस्तोवर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हय़ाची नोंद झाली नव्हती.

Web Title: Unidentified flying vehicles uncle!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.