पुतण्याने मित्रांच्या मदतीने काढला सख्ख्या काकाचा काटा
By Admin | Updated: March 25, 2017 21:40 IST2017-03-25T21:40:00+5:302017-03-25T21:40:00+5:30
कौटुंबीक वादातून पुतण्याने आपल्या मित्रांच्या मदतीने सख्ख्या काकाचा खून केला. वाशिम येथील ही घटना आहे.

पुतण्याने मित्रांच्या मदतीने काढला सख्ख्या काकाचा काटा
>ऑनलाइन लोकमत
मंगरुळपीर (वाशिम), दि. 25 - स्वासीन (चेहेल) येथे कौटुंबीक वादातून पुतण्याने आपल्या मित्रांच्या मदतीने सख्ख्या काकाचा खून केला. ही घटना 24 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील स्वासीन येथील साहेबराव बाकुजी मारकड हे आपल्या कुटुंबासोबत गावात वास्तव्याला आहेत. याच गावात त्यांचा पुतण्या मोहन पंजाबराव मारकड याने 24 मार्चच्या रात्री त्याचे काही मित्रसोबत घेवून साहेबराव मारकड यांचे घर गाठले. घराच्या दरवाजाला लाथा मारून अश्लिल शिविगाळ केली. यावेळी साहेबराव घरातून बाहेर आले असता, मोहनने डोळ्यात तिखट पदार्थ टाकला आणि गोपाल हिसेकर, किशोर हिसेकर, सुनील हिसेकर यांनी संगणमताने साहेबराव यांच्यावर काठ्या व कु-हाडीने वार केले. यात साहेबराव यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी साहेबराव यांच्या मुलाने पोलिसात तक्रार दाखल केली. मुलाच्या फिर्यादीवरुन मोहन पंजाबराव मारकड, गोपाल पांडूरंग हिसेकर, किशोर रामदास हिसेकर, सुनील रामदास हिसेकरविरोधात गुन्हा दाखल करून सर्वांना अटक करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार रविंद्र जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी रमेश जाधव करित आहेत.