शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

विनापरवाना बांधकाम होणार अधिकृत; रिसोड नगर परिषदतर्फे विशेष मोहिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 5:00 PM

रिसोड : राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार नगर परिषद हद्दीमधील अनधिकृत व विनापरवाना बांधकामे अधिकृत करण्यासाठी नगर परिषदतर्फे विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.

ठळक मुद्दे परवानगी घेतली असेल, पण नियमानुसार बांधकाम केले नसेल तर त्यासाठीदेखील बांधकामे नियमित केली जाणार आहे. अनधिकृत, विनापरवान केलेली बांधकामे अधिकृत होणार असली तरी त्यासाठी शासनाची नियमावली आहे. रिसोड नगर परिषद हद्दीतील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी नगर परिषदेकडे अर्ज करता येणार आहेत.

रिसोड : राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार नगर परिषद हद्दीमधील अनधिकृत व विनापरवाना बांधकामे अधिकृत करण्यासाठी नगर परिषदतर्फे विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या योजनेचा शहरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मुख्याधिकारी सुधाकर पानझाडे यांनी गुरूवारी केले.

नगर परिषदेची परवानगी घेतल्यानंतर घर किंवा व्यापारी संकुलांचे बांधकाम करता येते. रिसोड शहरात अनेकांनी कोणत्याही यंत्रणेची परवानगी न घेतला  बांधकामे केली आहेत. यापूर्वी विनापरवाना बांधकामप्रकरणी संबंधितांविरूद्ध कठोर कारवाई प्रस्तावित होती. आता शासनस्तरावरूनच शासनाच्या निकषानुसार पात्र ठरलेली विनापरवाना बांधकामे अधिकृत करण्यासाठी विशेष मोहिम राबविली जात आहे. परवानगी घेतली असेल, पण नियमानुसार बांधकाम केले नसेल तर त्यासाठीदेखील बांधकामे नियमित केली जाणार आहे. रिसोड नगर परिषद हद्दीतील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी नगर परिषदेकडे अर्ज करता येणार आहेत. अनधिकृत, विनापरवान केलेली बांधकामे अधिकृत होणार असली तरी त्यासाठी शासनाची नियमावली आहे. शासनाच्या निकषानुसार संबंधित बांधकाम अधिकृत होत असेल तरच आवश्यक दंड व शुल्काचा भरणा केल्यानंतर सदर बांधकाम अधिकृत केले जाणार आहे. जागा किंवा घरासंदर्भात मालकी हक्काचा वाद किंवा दावा नसलेला असावा. निर्धारित पेक्षा किती बांधकाम जास्त झाले त्याचाही विचार या मोहिमेदरम्यान केला जाणार आहे. यासंदर्भातील सर्व प्रमाणपत्र व अन्य बाबींची प्रशासकीय दृष्टिकोनातून पाहणी केली जाणार आहे. कागदपत्रे सादर करून बांधकाम अधिकृत करून घ्यावे, असे आवाहन मुख्याधिकारी सुधाकर पानझाडे यांनी केले.

टॅग्स :washimवाशिम