उंबर्डा बाजार ग्रामपंचायतच्या निवडणुकीत ६३.४३ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:45 IST2021-01-16T04:45:27+5:302021-01-16T04:45:27+5:30
* * * * उंबर्डा बाजार ग्रामपंचायतीच्या पाच प्रभागांतील १३ सदस्य निवडीसाठी ४२ उमेदवार निवडणुक रिंगणात होते. पाच प्रभागांत ...

उंबर्डा बाजार ग्रामपंचायतच्या निवडणुकीत ६३.४३ टक्के मतदान
* * * * उंबर्डा बाजार ग्रामपंचायतीच्या पाच प्रभागांतील १३ सदस्य निवडीसाठी ४२ उमेदवार निवडणुक रिंगणात होते. पाच प्रभागांत चुरशीची निवडणूक झाल्याने मतदानाची टक्केवारी वाढल्याचे अनेक प्रभागांत दिसून आले.
प्रभाग क्र. ................ मध्ये १०३२ मतदारांपैकी ६०७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून ५८.८१ टक्के मतदान* झाले . प्रभाग क्र. २ मध्ये ८८९ मतदारांपैकी ५३७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून ६०.४० टक्के मतदान* झाले. प्रभाग क्र. ३ मध्ये ५६३ मतदारांपैकी ३७६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून ६६.७८ टक्के मतदान* झाले. प्रभाग क्र. ४ मध्ये १०५३ मतदारांपैकी ६६६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून ६३.२४ टक्के मतदान* झाले . प्रभाग क्र. ५ मध्ये १०४६ मतदारांपैकी ७२५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून ६९.३१ टक्के मतदान* झाले. उंबर्डा बाजार ग्रामपंचायतीच्या एकूण ४५८३ मतदारांपैकी २९११ मतदार बांधवांनी मतदानाचा हक्क बजावून एकूण ६३.४३ टक्के मतदान* झाले.
मतदान केंद्राच्या परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने कारंजा ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार गजानन धंदर यांच्या मार्गदर्शनाखाली पी. एस. आय. आर.पी. भास्कर तथा त्याच्या सहकारी कर्मचारी मंडळीनी चोख बंदोबस्त ठेवला होता; तर मतदान प्रक्रिया सुलभ होण्यासाठी ग्रामविकास अधिकारी जयकिसन आडे, पटवारी मुंडाले तथा पोलीस पाटील उमेश देशमुख यांनी मोलाचे सहकार्य केले.