शौचालयांसाठी अल्टिमेटम; बांधकामासाठी रेती मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:45 IST2021-01-13T05:45:32+5:302021-01-13T05:45:32+5:30

जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात २१५, मालेगाव ६८२, मंगरूळपीर ४७५, मानोरा ८३, रिसोड ८९१ आणि वाशिम तालुक्यात ६५४ शौचालयांच्या बांधकामास स्वच्छ ...

Ultimatum for toilets; No sand for construction! | शौचालयांसाठी अल्टिमेटम; बांधकामासाठी रेती मिळेना!

शौचालयांसाठी अल्टिमेटम; बांधकामासाठी रेती मिळेना!

जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात २१५, मालेगाव ६८२, मंगरूळपीर ४७५, मानोरा ८३, रिसोड ८९१ आणि वाशिम तालुक्यात ६५४ शौचालयांच्या बांधकामास स्वच्छ भारत मिशनअंतर्गत मंजुरी मिळालेली आहे. दरम्यान, या कामांचे चोख नियोजन करण्यात यावे, शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाल्यासंबंधीचे छायाचित्र ठरावीक पद्धतीने अपलोड केले जावेत. तसेच ग्रामपंचायत सचिवांच्या स्वाक्षरीनिशी प्रस्ताव पंचायत समितीस्तरावर प्राप्त झाल्यानंतरच संबंधित लाभार्थींना शौचालयांसाठी निर्धारित करण्यात आलेला निधी वितरित करण्यात यावा, अशा सूचना उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकाऱ्यांना ६ जानेवारी रोजी पाठविलेल्या पत्राव्दारे केल्या आहेत. प्रत्यक्षात मात्र जिल्ह्यात कुठेही रेती उपलब्ध नसल्याने शौचालयांचे बांधकाम पूर्ण करण्यात अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे ३१ जानेवारीपर्यंत ही बाब कशी साध्य होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

..................

बॉक्स :

चोरीच्या मार्गाने येणाऱ्या रेतीचे दर अव्वाच्या सव्वा

वाशिम जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांपासून एकाही रेतीघाटाचा लिलाव झालेला नाही. त्यामुळे अवैधरीत्या उत्खनन करून तथा नजीकच्या काही जिल्ह्यांमधून चोरीच्या मार्गाने जिल्ह्यात काही तस्कर रेती आणत आहेत. त्याचे दर मात्र अव्वाच्या सव्वा असून, अनुदानावरील शौचालय बांधकामासाठी हे दर परवडणारे नाहीत.

........................

३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करावयाची शौचालयांची संख्या

कारंजा तालुका - २१५

मालेगाव तालुका - ६८२

मंगरूळपीर तालुका - ४७५

मानोरा तालुका - ८३

रिसोड तालुका - ८९१

वाशिम तालुका - ६५४

Web Title: Ultimatum for toilets; No sand for construction!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.