मानोरा-रतनवाडीरस्त्यावर झाडे जाळण्याचा प्रकार सर्रास

By Admin | Updated: May 13, 2017 13:58 IST2017-05-13T13:57:47+5:302017-05-13T13:58:30+5:30

प्रमुख रोडवरील साईड जाळुन त्यावरील मोठमोठे वृक्ष जाळण्याचा प्रकार तालुक्यात सर्रास चालु आहे.

The type of burnt plantation on Manora-Ratanwadi is very common | मानोरा-रतनवाडीरस्त्यावर झाडे जाळण्याचा प्रकार सर्रास

मानोरा-रतनवाडीरस्त्यावर झाडे जाळण्याचा प्रकार सर्रास

मानोरा : प्रमुख रोडवरील साईड जाळुन त्यावरील मोठमोठे वृक्ष जाळण्याचा प्रकार तालुक्यात सर्रास चालु आहे.मात्र संबंधीत विभाग या प्रकाराकडे फारसे गंभीर असल्याचे दिसत नाही.
मानोरा शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या मानोरा रतनवाडी या प्रमुख मार्गावर रस्त्याच्या कडा जाळुन मोठ्या प्रमाणात कत्तल झाल्याच्या प्रकार उघडकीस आला आहे. अनेक वर्षाचा असलेला वृक्ष खालुन जळाल्याने जमीन दोस्त झाला आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी शासन मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करत आहे. त्यासाठी लाखो रुपये खर्च करुन त्याचे संगोपन सुध्दा केले जात आहे. शाळा,महाविद्यालय आणि स्थानिक प्रशासनाला सोबत घेवुन झाडे लावा झाडे वाचावा,  अशा  प्रकारचा गजर केला जात आहे, परंतु काही नागरिक प्रमुख रस्त्याच्या कडा जाळुन मोठ्या प्रमाणात वृक्षाची कत्तल चालवली आहे.शिवाय वनीकरण विभागामार्फत नव्याने लावलेली झाडे सुध्दा राख होत आहे.

Web Title: The type of burnt plantation on Manora-Ratanwadi is very common

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.