वर्षभरानंतर दाखल झाला दोन आरोपींवर खुनाचा गुन्हा!

By Admin | Updated: May 14, 2017 02:15 IST2017-05-14T02:15:48+5:302017-05-14T02:15:48+5:30

चोरद येथील घटना; आरोपींना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी.

Two year after the crime of murder! | वर्षभरानंतर दाखल झाला दोन आरोपींवर खुनाचा गुन्हा!

वर्षभरानंतर दाखल झाला दोन आरोपींवर खुनाचा गुन्हा!

जउळका रेल्वे : गतवर्षीच्या जून महिन्यात नागपूर-औंरगाबाद महामार्गावरील गिव्हा फाट्यावर दुचाकीस्वार युवकास अज्ञात वाहनाने उडवून दिल्यामुळे त्याचा मृत्यू झाला; मात्र हा अपघात नसून घातपात असल्याची तक्रार मृताच्या आईने केली होती. त्यावरून पोलिसांनी केलेल्या चौकशीत ही बाब निष्पन्न झाल्याने १२ मे रोजी चोरद येथील दोन आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल केला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ जून २0१६ रोजी अज्ञात वाहनाची धडक लागून दीपक खंडारे (रा.चोरद) या युवकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरूद्ध जऊळका पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता; परंतु मृताच्या आईने हा अपघात नसून, घातपात असल्याचा संशय व्यक्त करून सखोल चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार, पोलिसांनी चौकशी करून १२ मे रोजी चोरद येथीलच संतोष गुठे (वय ३२ वर्षे) व संतोष आंधळे (वय २२ वर्षे) या दोघांना अटक करून त्यांच्याविरूद्ध कलम ३0२, २0१ भादंविनुसार गुन्हा दाखल केला. घटनेतील पुरावे नष्ट करण्याचा ठपकाही आरोपींवर ठेवण्यात आला आहे. आरोपींना १३ मे रोजी वाशिम येथील न्यायालयासमक्ष हजर केले असता, त्यांना न्यायालयाने १५ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: Two year after the crime of murder!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.