शेतात जनावरे चारण्याच्या वादातून दोघांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:44 IST2021-09-18T04:44:50+5:302021-09-18T04:44:50+5:30
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार फ़िर्यादी जगन्नाथ आकाराम बलोदे रा. शिवाजी नगर धामणी मानोरा यांनी फिर्याद दिली की, फिर्यादीची मुले योगीनाथ ...

शेतात जनावरे चारण्याच्या वादातून दोघांना मारहाण
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार फ़िर्यादी जगन्नाथ आकाराम बलोदे रा. शिवाजी नगर धामणी मानोरा यांनी फिर्याद दिली की, फिर्यादीची मुले योगीनाथ उर्फ भोला बलोदे, ओम बलोदे यांनी आरोपी नवनाथ गुणवंत आडोळे याला जनावरे शेतात का सोडता, असे विचारले. त्यावरून आरोपी गुणवंत तुळशीराम आडोळे, नवनाथ गुणवंत आडोळे, सनी उर्फ प्रशांत गुणवंत आडोळे, वैभव गुणवंत आडोळे रा. भायजीनगर सोमठाणा यांनी संगनमत करून भोला व ओम यांना शिवीगाळ केली, तसेच जबर मारहाण करून जखमी करीत जिवे मारण्याचा प्रयत्न केला, अशा आशयाच्या फिर्यादी वरुन मानोरा पोलिसांनी उपरोक्त चारही आरोपींवर कलम ३२६, ५०४, ५०६, ३४ भादंविनुसार गुन्हे दाखल करीत तात्काळ अटक केली. दरम्याल, १७ सप्टेंबर रोजी त्यांना न्यायालयापुढे हजर केले असता, न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. घटनेचा अधिक तपास बिट जमादार जगन्नाथ घाटे करीत आहेत.