दोन ट्रकची समोरासमोर धडक; चार जण गंभीर

By Admin | Updated: August 20, 2016 02:40 IST2016-08-20T02:40:41+5:302016-08-20T02:40:41+5:30

वाशिम जिल्ह्यातील गिव्हा फाट्यावरील घटना.

Two trucks hit face to face; Four people are serious | दोन ट्रकची समोरासमोर धडक; चार जण गंभीर

दोन ट्रकची समोरासमोर धडक; चार जण गंभीर

जउळका रेल्वे (जि. वाशिम) : औरंगाबाद ते नागपूर जलद गती मार्गावर दोन ट्रकच्या समोरासमोर झालेल्या धडकेत चार जण गंभीर जखमी झाले. हि घटना गिव्हा फाट्यावर गुरुवारी मध्यरात्री घडली.
कामठीवरुन आठ म्हशी घेऊन औरंगाबादकडे जाणारा ४0 एन ७५९ क्रमांकाचा ट्रक व मालेगाववरुन कारंजाकडे जाणार्‍या ट्रकदरम्यान भीषण टक्कर झाली. या अपघातात औरंगाबादकडे जाणार्‍या ट्रकचा चालक महम्मद खान ईब्राहीम खान (४५), मकबुल अहमद फईन अख्तर (१७), शेख हुसेन शेख जुमान (५५)गंभीर जखमी झाले. तर कारंजाकडे जात असलेल्या नांदेड येथील ट्रकचा चालक आनंद आढाव हा सुद्धा जखमी झाला. औरंगाबादकडे जाणार्‍या ट्रकमधील गंभीर जखमी झालेल्या तिघांना उपचारासाठी अकोला हलविण्यात आले असून, कारजांकडे जाणार्‍या ट्रकच्या चालकावर मालेगावात उपचार केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
 

Web Title: Two trucks hit face to face; Four people are serious