दोन टिप्परची समोरासमोर धडक

By Admin | Updated: February 25, 2017 02:11 IST2017-02-25T02:11:17+5:302017-02-25T02:11:17+5:30

शेगाव तालुक्यातील घटना.

The two tips face a face-to-face-face | दोन टिप्परची समोरासमोर धडक

दोन टिप्परची समोरासमोर धडक

शेगाव, दि. २४- शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या वरवट मार्गावरील कालखेडजवळ दोन रेतीच्या टिप्परची समोरासमोर धडक झाल्याची घटना शुक्रवारी घडली.
खिरोडा येथील एक विना नंबरप्लेटचे रेती भरून असलेले टिप्पर शेगावकडे येत असताना समोरील बसला ओव्हरटेक करीत असताना शेगावहुन काझीखेड येथे रेती भरण्यासाठी मजुरांना घेऊन जात असलेल्या बाळापूर येथील एमएच 0४-बीयू ६६५९ या क्रमांकाचे टिप्पर समोरासमोर धडकले. या अपघातात सुदैवाने कोणतीही प्राणहानी झाली नाही. टिप्पर चालक शाकिरखान रूमखान याने त्याचे टिप्परचे ३५ हजारांचे नुकसान झाले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: The two tips face a face-to-face-face