दोन चोरट्यांना मूर्तिजापूरातून अटक
By Admin | Updated: September 20, 2014 22:07 IST2014-09-20T22:07:24+5:302014-09-20T22:07:24+5:30
कारंजा पोलीसांची कामगिरी : ३५ ग्रॅम सोने जप्त.

दोन चोरट्यांना मूर्तिजापूरातून अटक
कारंजालाड (वाशिम): कारंजा शहरातील महिलांच्या गळ्यातून मंगळसूत्र व सोन्याचे दागीने चोरणा-या दोन युवकांना गुन्हे आन्वेषन विभागाच्या पथकाने २0 सप्टेंबर रोजी अटक केली. त्यांच्या जवळून २५ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. अंबादास सुखदेव साळोकार वय ३३ व रईस कुरेशी रफीक कुरेश्ी वय २३ दोघे रा.मूर्तिजापूर अशी या चोरट्यांची नावे आहेत.
या चोरट्यांनी शहरात ३ ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली आहे. कारंजा शहरात मागील सहा महिन्यात बालाजी नगरी, कांचन विहार, शेतकरी निवास, धाबेकर सभागृहाच्या बाजूला मोटारसायकलवर आलेल्या अज्ञात चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व इतर दागिने जबरीने चोरून नेत पोलीसांसमोर आव्हान उभे केले होते. डीबीच्या पथकाने खबर्यांच्या मदतीने या चोरट्यांचा माग काठत त्यांना मूर्तिजापूर येथून अटक केली. त्यांच्या जवळून २५ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. त्यांची प्राथमिक चौकशी केली असता त्यांनी शहरात ३ ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली आहे. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली असून या दरम्यान चौकशीत आणखी काही गुन्हे निष्पन्न होवून मुद्देमाल हस्तगत होवू शकतो.