दरोडाप्रकरणी दोन संशयितांना अटक
By Admin | Updated: October 22, 2016 02:24 IST2016-10-22T02:24:52+5:302016-10-22T02:24:52+5:30
मालेगाव येथील दरोडाप्रकरणात दोन संशयितांना अटक करण्यात आली.

दरोडाप्रकरणी दोन संशयितांना अटक
मालेगाव, दि. २१- गत काही महिन्यांपूर्वी पडलेल्या दरोड्यातील दोन संशयितांना अटक करण्यात मालेगाव पोलिसांना २१ ऑक्टोबरला यश मिळाले.
मालेगाव शहरात गत काही महिन्यांपूर्वी चोरी व दरोड्याचे सत्र सुरू होते. यामुळे संपूर्ण शहर हादरून गेले होते. एका व्यापार्यावर तर जीवघेणा हल्लाही झाला होता. शहरात काही ठिकाणी दरोडे पडले होते. या दरोड्यातील संशयित म्हणून मो. तरबेज मो. दाऊद शेख (वय ३७), फरहान शेख मुमताज शेख (२८) रा. साकीनाका, मुंबई यास अहमदनगर कारागृहातून मालेगाव येथे आणण्यात आले. विद्यमान न्यायालयात हजर केले असता, त्यांना २३ ऑक्टोबरपर्यंंंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गवई करीत आहेत.