गांजा व गुटख्याची दोन संशयास्पद वाहने ताब्यात
By Admin | Updated: April 15, 2016 02:07 IST2016-04-15T02:07:21+5:302016-04-15T02:07:21+5:30
कारंजा लाड येथील घटना.

गांजा व गुटख्याची दोन संशयास्पद वाहने ताब्यात
कारंजा लाड ( जि. वाशिम):: गांजा व गुटख्याची वाहतूक करीत असल्याच्या संशयावरून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या ग्राम शेलुवाडा येथील ढाब्याजवळ दोन टाटा एसी वाहने १४ एप्रिल रोजी रात्नी ८ वाजताच्या सुमारास चौकशीसाठी ताब्यात घेतली. या वाहनांमध्ये गांजा व गुटख्याने भरलेली ३0 पोती पोलिसांना सापडल्याची चर्चा आहे.
नागपूर- औरगांबाद महामार्गावर अवैधरीत्या गांजा व गुटखा घेऊन टाटा एसी वाहन येत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यावरून ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठोणदार श्रीराम घुगे यांच्या मार्गदशर्नात पोलिसांचे पथक तत्काळ रवाना झाले.
शेलुवाडा नजिकच्या ढाब्याजवळ दोन वाहने संशयास्पद स्थितीत उभी असल्याचे पोलिसांना दिसून आले. त्यावरून पोलिसांच्या पथकातील पोलीस अधिकार्यांनी चौकशी केली असता. त्या वाहनामध्ये ३0 पोती आढळून आली. या पोत्यांमध्ये गांजा व गुटखा असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी टाटा एसी.क्र. एम.एच.२७ एक्स- ५६८२ व दुसरा टाटा एसी.क्र.एम.एच.२७ एक्स- ८२३९ ही दोन्ही वाहने पोलिसांनी ताब्यात घेऊन वाहन चालक अनुक्रमे मो.साबीर मो. रफीक (१९), मो. साजिद मो. रफिक (२१) व शेख रहिम शेख मेहबूब (२९) सर्व राहणार अलिम नगर अमरावती यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.