दोन मोटारसायकल चोरटे जेरबंद

By Admin | Updated: July 12, 2014 02:11 IST2014-07-12T02:07:40+5:302014-07-12T02:11:40+5:30

पोलिसांनी हस्तगत केल्या मोटारसायकली: वाशिमची घटना

Two motorbike robbery | दोन मोटारसायकल चोरटे जेरबंद

दोन मोटारसायकल चोरटे जेरबंद

वाशिम : येथील रिसोड नाका परिसरामधून मोटारसायकल चोरून नेताना रिसोड तालुक्यातील चिचांबा येथील व मालेगाव तालुक्यातील करंजी येथील दोन मोटारसायकल चोरट्यांना पोलिसांनी रंगेहात पकडले. ही घटना अनुक्रमे ९ व १0 जुलै रोजी घडली.
प्राप्त माहितीनुसार टिळक चौक वाशिम येथील लक्ष्मण रामभाऊ शेळके यांची एम.एच. ३७ एच २८८८ क्रमांकाची मोटारसायकल रिसोड नाक्यावरील एका किराणा दुकानसमोर उभी होती. सदर मोटारसायकल सायंकाळी ५ वाजताचे सुमारास लंपास करताना आरोपी संतोष तुकाराम आहेरकर (वय ३१) याला डिटेक्शन ब्रँचच्या पथकाने रंगेहात पकडले. या पथकामध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक उदय सोयस्कर, सुनील पवार, हरिष दंदे, राजेश बायस्कर यांचा समावेश होता.
तर दुसर्‍या एका घटनेत करंजी येथील सराईत गुन्हेगार संजय खाडे याने लाखाळा परिसरामधून श्रीराम सुर्वे यांची हिरो होंडा पॅशन रात्री ११ वाजताच्या सुमारास लंपास केली. आरोपी खाडे हा दारू पिऊन तर्र असल्याने पोस्ट ऑफिस चौकामध्ये त्याचे मोटारसायकलीवरील नियंत्रण सुटल्याने तो एका नाल्यामध्ये जाऊन पडला. त्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी खाडे याला अटक करण्याची कारवाई पोलिस उपनिरीक्षक रुईकर व पोलिस शिपाई सुरेश येलमुरे यांनी केली.

Web Title: Two motorbike robbery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.