आणखी दोन पॉझिटिव्ह; एक कोरोनामुक्त !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:43 IST2021-08-26T04:43:57+5:302021-08-26T04:43:57+5:30
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अतिशय घटले ...

आणखी दोन पॉझिटिव्ह; एक कोरोनामुक्त !
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अतिशय घटले आहे. बुधवारी दोन जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले, तर एका बाधिताने कोरोनावर मात केली. मंगरूळपीर तालुक्याचा अपवाद वगळता उर्वरित पाच तालुक्यांत एकही कोरोना रुग्ण आढळून आलेला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात ४१,७०३ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४१,०५५ रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर आतापर्यंत ६३७ जणांचा मृत्यू झाला. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले.
००००
१० सक्रिय रुग्ण
बुधवारच्या अहवालानुसार नव्याने २ रुग्ण आढळून आले तर एक जणाने कोरोनावर मात केली आहे. सध्या गृहविलगीकरणात एकूण १० रुग्ण आहेत. एकही रुग्ण दवाखान्यात दाखल नाही.
००००००
पाच तालुके निरंक
बुधवारच्या अहवालानुसार मंगरूळपीर तालुक्याचा अपवाद वगळता रिसोड, मालेगाव, कारंजा, मानोरा व वाशिम तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नसल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.