फसवणूकप्रकरणी आरोपीस दोन महिने कारावास!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 19:51 IST2017-10-04T19:50:58+5:302017-10-04T19:51:26+5:30
मंगरूळपीर: आदिवासी वसतिगृहातील भोजनालयाचा ठेका देण्याची बतावणी करून ३० हजाराने फसवणूक करणाºया आरोपीस येथील न्यायालयाने ४ आॅक्टोबर रोजी दोन महिने कारावासाची शिक्षा सुनावली.

फसवणूकप्रकरणी आरोपीस दोन महिने कारावास!
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरूळपीर: आदिवासी वसतिगृहातील भोजनालयाचा ठेका देण्याची बतावणी करून ३० हजाराने फसवणूक करणाºया आरोपीस येथील न्यायालयाने ४ आॅक्टोबर रोजी दोन महिने कारावासाची शिक्षा सुनावली.
रामेश्वर रामचंद्र भड (रा.आठवडे बाजार, मंगरूळपीर) यांनी २९ मार्च २०१७ रोजी मंगरूळपीर पोलिस ठाण्यात नोंदविलेल्या फिर्यादीत नमूद केले होते, की प्रकाश रामकृष्ण भोरकडे (रा.अशोकनगर, मंगरुळपीर) फिर्यादीला आदिवासी वसतिगृहातील भोजनालयाचा ठेका देण्याची बतावणी करून ३० हजार रुपये घेतले. ते परत मागितले असता अश्लिल भाषेत शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. अशा फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी प्रकाश भोरकडे याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले.
दरम्यान, साक्ष व पुराव्यांच्या आधारे आरोपीविरुध्द गुन्हा सिध्द झाल्याने प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी एम.आर.पनाड यांनी आरोपीस दोन महिने कारावासाची शिक्षा व ५०० रुपये दंड. दंड न भरल्यास १५ दिवस आणखी कारावासाची शिक्षा व कलम ५०६ (२) मध्ये १ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना कारावासाची शिक्षा सुनावली.