शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जण ठार; एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 01:27 IST

वाशिम: दोन वेगवेगळ्या अपघातात  दोन जण ठार, तर  एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी घडली.

ठळक मुद्देकामरगाव : दुचाकीच्या चाकात साडीचा पदर  अडकल्याने महिलेचा मृत्यूकनेरगाव: ट्रकने धडकेत दिल्याने दुचाकीस्वार ठार 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: दोन वेगवेगळ्या अपघातात  दोन जण ठार, तर  एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी घडली.कामरगाव: दुचाकीच्या चाकामध्ये साडीचा पदर  अडकल्याने खाली पडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना  कारंजा तालुक्यातील लाडेगाव गावानजीक ७ सप्टेंबर  रोजी दुपारच्या सुमारास घडली. रंजना नरेंद्र देशमुख  (४४) असे मृतक महिलेचे नाव आहे.एम.एच.२९ एक्स ४२७ क्रमांकाच्या दुचाकीवर  वटफळी, ता. नेर, जि. यवतमाळ येथील देशमुख हे  कामरगावरून लाडेगावमार्गे वटफळी येथे जात होते.  दरम्यान, दुचाकीवर बसलेल्या रंजना नरेंद्र देशमुख  यांच्या साडीचा पदर चाकात अडकल्याने त्या लाडेगाव  गावानजीक खाली पडल्या. डोक्याला गंभीर इजा  झाल्याने त्यांना कामरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उ पचारार्थ आणण्यात आले; मात्र रुग्णालयात एकही डॉ क्टर नसल्याने जखमीला प्राथमिक उपचार मिळाले नाही त. पुढील उपचारार्थ अमरावती येथे नेत असताना, रस् त्यातच रंजना देशमुख यांची प्राणज्योत मालवली. या  घटनेची सर्व माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना  देण्यात आली. जिल्हाधिकार्‍यांनी घटनेचे गांभीर्य  ओळखून कारंजा तहसीलदारांना तातडीने कामरगावच्या  ग्रामीण रुग्णालयात पाठविले. याबाबत आमदार राजेंद्र  पाटणी यांनी वैद्यकीय उपसंचालकांशी मोबाइलद्वारे सं पर्क साधून कामरगाव येथे पर्यायी व्यवस्था करण्याच्या  सूचना दिल्या. त्यानुसार कामरगाव येथे लहाने नामक  डॉक्टारांची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात आले.  घटनेचा पुढील तपास ठाणेदार मानकर यांच्या  मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल गुहे,  सहायक पोलीस उपनिरीक्षक गजानन कदम, जमादार  नरेंद्र राजगुरे, सुनील टाले करीत आहेत.कनेरगाव: ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत  दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी रात्री  ७.३0 वाजतादरम्यान हिंगोली ते कनेरगाव मार्गावरील दं त महाविद्यालयाजवळ घडली.राजू अढाव (४२) व ज्ञानेश्‍वर येवले (३८) रा.  ब्राह्ममवाडा, ता. वाशिम हे दोघे जण हिंगोलीवरून  वाशिमकडे दुचाकीवर येत होते. दरम्यान, हिंगोली ते  कनेरगाव मार्गावरील दंत महाविद्यालयानजीकच्या  हरियाणा ढाब्याजवळ एका ट्रकने दुचाकीला जबर धडक  दिली. यामध्ये राजू अढाव हा जागीच ठार झाला, तर  ज्ञानेश्‍वर येवले हा गंभीर जखमी असून, त्यास परभणी  येथील रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले आहे. या  घटनेचा पुढील तपास हिंगोली पोलीस करीत आहेत.