वेगवेगळ्या दोन अपघातात दोन ठार
By Admin | Updated: August 31, 2016 02:15 IST2016-08-31T02:15:01+5:302016-08-31T02:15:01+5:30
रिसोड तालुक्यात दोन अपघात.

वेगवेगळ्या दोन अपघातात दोन ठार
रिसोड(जि.वाशिम), दि. ३0 : वेगवेगळ्या दोन अपघातात दोन जण ठार तर सहा जण जखमी झाल्याच्या दोन घटना तालुक्यातील भर जहागीर व हराळ-वरखेडा मार्गादरम्यान घडल्या.
देवदर्शनासाठी गेलेल्या भक्तांचा परतीच्या प्रवासादरम्यान मोटारसायकलस्वाराने कट मारल्याने ऑटोमधील एक प्रवासी ठार व तीन जण जखमी झाल्याची घटना २९ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता भर जहागीर येथे घडली आहे. गुरुसिद्ध मिटकरी यांनी फिर्याद नोंदविली की, श्रावण सोमवारनिमित्त देवदर्शनासाठी लोणार सरोवर येथे जावून परतीकरिता निघालो असता, भरजहागीर येथील पुलाजवळ आटो क्रमांक एम.एच. ३९/३९८४ ला समोरुन भरधाव वेगाने येत असलेल्या मोटारसायकलने कट मारला. त्यामुळे अाँटो पलटी होऊन प्रमिला मिटकरी, लक्ष्मी चिभडे, शारदा धोत्रे, कस्तुरा घुगसे हे जखमी झाले. यामधील प्रमिला मिटकरी यांचा उपचारादरम्यान खासगी दवाखान्यात मृत्यू झाला. आरोपीविरुद्ध कलम २७९, ३0८, ३३७ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला.
हराळ : भररस्त्यावर मोटारसायकलला समोरुन आलेल्या मोटारसायकलने धडक दिल्याने एक जण ठार व तीन जण जखमी झाल्याची घटना ३0 ऑगस्ट रोजी सकाळी १0.३0 वाजता हराळ ते वरखेडा मार्गावर घडली आहे. राजू सावके यांनी फिर्याद नोंदविली की, फिर्यादीचे वडील नामे नामदेव सावके व वहिनी दीपाली सावके हे रा. कवठा ता. सेनगाव हे मोटारसायकलने ताकतोडा हराळमार्गे रिसोडला जात असताना हराळ ते वरखेडा दरम्यान गजानन सरकटे यांच्या शेताजवळ समोरुन येणार्या मोटारसायकलने धडक दिली. यामध्ये नामदेव सावके यांचा जागीच मृत्यू झाला. दोन्ही मोटारसायकलवरील तिघे जण जखमी झाले. जखमींना सरकारी दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले.