वीज पडून दोन ठार; तीन जखमी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 05:56 PM2020-10-11T17:56:43+5:302020-10-11T17:56:50+5:30

नाना जयराम टोंग व नारेगाव येथील धीरज गजानन दोरक यांचा मृत्यू झाला.

Two killed by lightning; Three injured! | वीज पडून दोन ठार; तीन जखमी !

वीज पडून दोन ठार; तीन जखमी !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड (वाशिम) : वीज पडून दोनजण ठार तर तीनजण जखमी झाल्याची घटना कारंजा तालुक्यातील पिंपळगाव गुंजाटे व नारेगाव येथे ११ आॅक्टोंबर रोजी दुपारी १.३० व २.३० वाजताच्या दरम्यान घडल्या. नाना जयराम टोंग (५७) रा. पिंपळगाव गुंजाटे व धीरज गजानन दोरक (१६) रा. नारेगाव अशी मृतकांची नावे आहेत. तेजस्विनी नाना टोंग (५०), राम नाना टोंग (३०) दोघेही रा. पिंपळगाव गुंजाटे तसेच गजानन तुकाराम दोरक (४५) रा. नारेगाव अशी जखमींची नावे आहेत.
रविवारी दुपारच्या सुमारास कारंजा तालुक्यासह पिंपळगाव गुंजाटे व नारेगाव शेतशिवारात विजांच्या कडकडाटासह परतीचा संततधार पाऊस झाला. सोयाबीन सोंगणीचा हंगाम सुरू असल्याने व अशातच पाऊस बरसल्याने सोयाबीनची गंजी झाकण्यासाठी उपरोक्त व्यक्ती शेतात गेल्या होत्या. शेतात वीज पडल्याने पिंपळगाव गुंजाटे येथील नाना जयराम टोंग व नारेगाव येथील धीरज गजानन दोरक यांच्या यामध्ये मृत्यू झाला तर तेजस्विनी नाना टोंग, राम नाना टोंग दोघेही रा. पिंपळगाव गुंजाटे तसेच गजानन तुकाराम दोरक रा. नारेगाव हे जखमी झाले. ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी खासगी व कारंजा उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, १२ व १३ आॅक्टोबर रोजीदेखील अतिपावसाचा इशारा हवामान खात्याने दिला असून, विजेपासून संरक्षण म्हणून शेतकºयांनी अधिक दक्षता घ्यावी, असे आवाहन तालुका प्रशासनाने केले.

Web Title: Two killed by lightning; Three injured!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.