जिल्ह्यात उद्या ‘दोन थेंब जीवनाचे’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:24 IST2021-02-05T09:24:50+5:302021-02-05T09:24:50+5:30
३१ जानेवारी रोजी पोलिओ बुथवर न आलेल्या बालकांना २ ते ६ फेब्रुवारी या कालावधीत सर्वेक्षणातून शोध घेऊन पोलिओचा डोज ...

जिल्ह्यात उद्या ‘दोन थेंब जीवनाचे’!
३१ जानेवारी रोजी पोलिओ बुथवर न आलेल्या बालकांना २ ते ६ फेब्रुवारी या कालावधीत सर्वेक्षणातून शोध घेऊन पोलिओचा डोज पाजला जाणार आहे. त्यासाठी १७१५ कर्मचाऱ्यांची चमू कार्यरत राहणार आहे.
...................
एकूण लाभार्थी - १,२२,३५७
एकूण प्राप्त लस - १,५४,०००
एकूण बुथ - ९७५
आरोग्य सेविका - १४५
पर्यवेक्षक - २५
मोबाईल पथक - ३०
ट्रान्झिस्ट पथक - १३९
...............
कोट :
कोरोना लसीकरण मोहिमेमुळे विलंब झालेल्या पोलिओ लसीकरण मोहिमेस ३१ जानेवारीपासून सुरूवात केली जात आहे. त्यासाठी ९७५ बुथ कार्यान्वित करण्यात आले असून त्यावर शून्य ते पाच वयोगटातील बालकांना पोलिओचा डोज दिला जाणार आहे. याशिवाय जी बालके यादिवशी डोस घेणार नाहीत, त्यांना पुढील पाच दिवस घरोघरी जाऊन डोस दिला जाणार आहे.
- डॉ. अविनाश आहेर
जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम