रेल्वेतून पडून दोघांचा मृत्यू!
By Admin | Updated: October 2, 2016 02:50 IST2016-10-02T02:50:51+5:302016-10-02T02:50:51+5:30
वाशिम जिल्ह्यात रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याच्या दोन घटना.

रेल्वेतून पडून दोघांचा मृत्यू!
जऊळका रेल्वे (जि. वाशिम) दि. 0१- चालत्या रेल्वेमधून पडून अपघाती मृत्यूच्या दोन घटना २९ आणि ३0 सप्टेंबर रोजी घडल्यात.
गुरूवार, २९ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास ४0 ते ४२ वयाच्या एका अनोळखी इसमाचा जऊळका-वाशिमदरम्यान रेल्वेतून पडून मृत्यू झाला. या इसमाच्या अंगावर निळसर रंगाची पॅन्ट आणि पांढर्या रंगाचे शर्ट असून याप्रकरणी पोलिसांनी र्मग दाखल केला आहे.
दुसर्या घटनेत नांगल ते नांदेड या एक्सप्रेस रेल्वेतून प्रवास करणार्या कृपालसिंग कर्णेलसिंग (वय ७0 वर्षे) या वृद्ध इसमाचा धमधमी शिवारात रेल्वेतून पडून मृत्यू झाला. ही घटना ३0 सप्टेंबरला रात्री ८.३0 च्या सुमारास घडली.