‘त्या’ आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडी

By Admin | Updated: March 18, 2015 01:25 IST2015-03-18T01:25:20+5:302015-03-18T01:25:20+5:30

प्रियकराने प्रेयसीस जाळल्याची रिसोड तालुक्यातील घटना.

Two days 'police custody' | ‘त्या’ आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडी

‘त्या’ आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडी

रिसोड (जि. वाशिम) : लग्नास नकार दिल्यामुळे प्रियकराने प्रेयसीस जाळल्याची घटना १२ मार्चला रात्री १२ वाजताच्या सुमारास ग्राम भरजहागीर येथे घडली होती. यामधील आरोपीस १९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे.
तालुक्यातील ग्राम भरजहागीर येथील १९ वर्षीय मुलगी घरात झोपली असताना आरोपी अरुण सभादिंडे वय ३0 व प्रमिला सरकटे हे दोघेही घरात घुसले व अरुण सभादिंडे यांनी जयास लग्नाची मागणी केली असता, त्यास नकार मिळाला, त्यामुळे रागाच्या भरामध्ये घरातील दिव्यामधील रॉकेल तिच्या अंगावर ओतून तिला जाळले. त्यामध्ये ती ८0 टक्के जळाली असून शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
या घटनेची तक्रार १६ मार्च रोजी पीडित मुलीच्या भावाने पोलिसांत दिली, यावरून आरोपी अरुण सभादिंडे व प्रमिला सरकटे यांच्या विरुध्द कलम ३0७, ३८ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. आरोपिला विद्यमान न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक दिगंबर कांबळे करीत आहेत.

Web Title: Two days 'police custody'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.