केनवड येथे दोन कोरोना रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:42 IST2021-05-12T04:42:19+5:302021-05-12T04:42:19+5:30
०००० वीज बिलामुळे सामान्य ग्राहक त्रस्त वाशिम : महावितरण कंपनीकडून वारंवार वीज दरवाढ, अतिरिक्त शुल्क तर कधी अतिरिक्त सुरक्षा ...

केनवड येथे दोन कोरोना रुग्ण
००००
वीज बिलामुळे सामान्य ग्राहक त्रस्त
वाशिम : महावितरण कंपनीकडून वारंवार वीज दरवाढ, अतिरिक्त शुल्क तर कधी अतिरिक्त सुरक्षा रकमेची देयके पाठविली जात आहेत. या कारभाराने त्रस्त असलेल्या वीज ग्राहकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. अवाजवी वीज बिल आल्यामुळे ग्रामस्थांसमोर बिल भरावे की उदरनिर्वाह करावा, असा प्रश्न पडला आहे.
०००००
अनसिंग येथे आरोग्य तपासणी
वाशिम : वाशिम तालुक्यातील अनसिंग येथे आणखी तीन जणांचा कोरोना चाचणी अहवाल ११ मे रोजी पॉझिटिव्ह आला. खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाने संपर्कातील नागरिकांची तपासणी केली असून, लवकरच त्यांचे स्वॅब घेतले जाणार आहेत.
००००
शेतशिवारात रानडुकरांचा धुमाकूळ
वाशिम : मालेगाव, वाशिम तालुक्यातील अनेक शेतशिवारात रानडुकरांनी हैदोस घातला आहे. दिवसा नदीकाठाजवळ राहून रात्रीच्या सुमारास रानटी डुकरे शेतात शिरून भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत.
०००००००
शासकीय इमारतीची दुरुस्ती करावी
वाशिम : शहरातील अनेक शासकीय कार्यालयाच्या इमारतींची पुनर्बांधणी करणे गरजेचे आहे. बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय यासह काही कार्यालये जीर्ण झाल्याने बऱ्याच ठिकाणी गळती लागते. परंतु याकडे शासन, प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी, शासकीय अधिकाऱ्यांसह सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
०००००
कार्यालयातील तक्रारपेट्या गायब
वाशिम : शासकीय कार्यालयात काही वर्षांपूर्वी तक्रारपेट्या लावण्यात आल्या होत्या. मात्र, बहुतांश कार्यालयातील तक्रारपेट्या गायब झाल्या आहेत. दरम्यान, तक्रार करण्यासाठी सामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
०००००
किन्हीराजा येथे आणखी चार कोरोना रुग्ण
वाशिम : मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा येथे आणखी चार जणांचा कोरोना चाचणी अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला असून, रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सर्दी, ताप, खोकला आदी लक्षणे असणाऱ्या नागरिकांनी कोरोना चाचणी करावी, असे आवाहन आरोग्य विभागाने मंगळवारी केले.
०००००
व्यायामशाळा उभारण्याची मागणी
वाशिम : रिसोड व मालेगाव तालुक्यातील काही गावात व्यायामशाळा नसल्याने युवकांना अडचण जात आहे. तालुक्यातील अनेक गावात ग्रामपंचायतींच्या माध्यमातून व्यायामशाळा निर्माण झाल्या आहेत, मात्र अजूनही काही गावात व्यायामशाळा नाहीत. यावर्षी कोरोनामुळे व्यायाम केंद्रावर निर्बंध आले आहेत. व्यायामशाळा मंजूर करण्याची मागणी परिसरातील युवकांमधून होत आहे.
००००