अपहरण प्रकरणातील दोन आरोपींना कोठडी
By Admin | Updated: February 19, 2015 00:20 IST2015-02-19T00:20:09+5:302015-02-19T00:20:09+5:30
आरोपींना २0 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी; बिड व गुलबर्गा येथे केली होती अटक.
_ns.jpg)
अपहरण प्रकरणातील दोन आरोपींना कोठडी
जानेफळ (जि. बुलडाणा): युवकाचे अपहरण केल्याप्रकरणी जानेफळ पोलिसांनी बिड व गुलबर्गा (कर्नाटक) येथून अटक करुन आणलेल्या दोन्ही आरोपींना २0 फेब्रुवारीपर्यंंत पोलिस कोठडी मिळाली आहे.
माळेगाव (ता. मेहकर) येथील दिनेश प्रकाश वानखेडे (२५) हा तरुण १४ फेब्रुवारी रोजी शनिवारला जानेफळ येथील आठवडी बाजारात आलेला असताना दुपारी ३ वाजतादरम्यान ये थील बसथांब्यावर उभा असताना बोलेरो गाडी (क्रमांक एम.एच.१२ -९५५२) मधून आलेल्या अज्ञात पाच ते सहा जणांनी त्याचे अपहरण करुन सुसाट वेगात सदर बोलेरो गाडी मेहकरच्या दिशेने रवाना झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी भादंविच्या कलम ३६३ व ३४ नुसार गुन्हा दाखल करून सदर अपहृत तरुण व अपहरणकर्त्यांंच्या शोधात गेलेल्या जानेफळ पोलिसांच्या प थकाने गुलबर्गा (कर्नाटक) येथून बाळासाहेब ज्ञानदेव शेंडगे (रा. पांग्री ता. मंठा जि. जालना) या आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर दुसरा आरोपी नामदेव दिनकर होळबे (रा. पांग्री ता. मंठा जि. जालना) याला बिड येथून अपहृत युवक दिनेश प्रकाश वानखेडेसह मोठय़ा शिताफीने पोलिस पथकाने अ.टक केली होती. अपहृत युवक व दोन्ही आरोपींना घेऊन १७ फेब्रुवारीच्या रात्री पर तलेल्या जानेफळ येथील पोलीस पथकाने १८ फेब्रुवारी रोजी उपरोक्त आरोपींना मेहकर न्यायालयात हजर केले असता, त्यांना २0 फेब्रुवारीपर्यंंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ऊसतोडणीच्या पैशाच्या वादातून सदर युवकाचे जानेफळ येथून अपहरण करण्यात आले होते. एकूणच या घटनेमुळे जानेफळ परिसरात कमालीची खळबळ उडाली होती.