विटंबनप्रकरणी अनसिंग बंद
By Admin | Updated: May 15, 2015 00:41 IST2015-05-15T00:41:06+5:302015-05-15T00:41:06+5:30
वाशिम जिल्ह्यातील अनसिंग येथील घटना.

विटंबनप्रकरणी अनसिंग बंद
अनसिंग (जि. वाशिम): गावाच्या मध्यभागी असलेल्या गांधी चौकामध्ये एका संताच्या फोटोवर शेण लावून त्यांची विटंबना करून मुस्लीम बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्याची घटना गुरुवारी सकाळी ६ वाजता दरम्यान घडली. या घटनेचा निषेध म्हणून दिवसभर अनसिंग बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली .
अनसिंग पोलीस स्टेशनला महंमद इस्तेखार अ. रहेमान यांनी फिर्याद दिली की, अनसिंग येथील गांधी चौकामधील रमेशचंद्र सारडा यांच्या प्रतिष्ठानवर मस्तानशाह बाबा यांच्या संदलचे मिरवणूक संदर्भात स्वागत बोर्ड (होर्डींग) लावले होते. त्या बोर्डवर मुस्लीम धर्माचे श्रद्धास्थान असलेले सैलानी बाबा, मस्तानशहा बाबा, हनिफशहा बाबा व खैरुशहा बाबा यांचे फोटो लावलेले होते. सदर संताच्या फोटोवर अज्ञात समाजकंटकाने मुस्लीम समाजाच्या भावना दुखवण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर व दृष्टपणाने शेण लावून त्यांची विटंबना केली. यावरून अनसिंग ठाणेदार चंद्रशेखर कदम यांनी अज्ञात इसमांवर कलम ३९५ (अ) भादंविप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.