तिसर्‍या दिवशीही पंप बंद

By Admin | Updated: October 25, 2014 00:12 IST2014-10-25T00:12:58+5:302014-10-25T00:12:58+5:30

मंगरूळपीर आगारातील डिझेल पंप बंद.

Turn off the pump on the third day | तिसर्‍या दिवशीही पंप बंद

तिसर्‍या दिवशीही पंप बंद

साहेबराव राठोड / मंगरुळपीर (वाशिम )
सर्वाधिक गर्दीच्या हंगामात मागील दोन दिवसांपासून मंगरूळपीर आगारातील डिझेल पंप बंद आहे. दिवाळीच्या सणासाठी येणार्‍या -जाणार्‍या प्रवाशांची गर्दी मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे; परंतु आगारातील अध्र्या अधिक एसटी बसेस डिझेलअभावी जागेवरच उभ्या असल्याने प्रवाशांची मोठय़ा प्रमाणात गैरसोय होत असल्याचे चित्र पहावयास मिळाले असून, यामध्ये स्थानिक आगाराच्या आर्थिक उत्पन्नावरदेखील मोठा दुष्परिणाम झाला आहे.
एसटी महामंडळाच्या आर्थिक उलाढालीत दिवाळी सणाला अधिक महत्त्व दिल्या जाते; परंतु याच सणा -सुदीच्या दिवशी आगारातील डिझेल पंप बंद असल्याने अनेक फेर्‍या रद्द झाल्या आहेत, त्यामुळे प्रवाश्यांची मोठय़ा प्रमाणावर गैरसोय झाली असून, दिवाळीच्या काळात अतिरिक्त बसेस सोडण्याचे नियोजन पार कोलमडले. तिसर्‍याही दिवशी डिझेल पंप बंद असल्याने सदर नियोजित गाड्यांचे वेळापत्रक सपशेल कोलमडले आहे. स्थानिक पातळीवर डिझेल पुरवठय़ाची किंवा आकस्मिक सुविधेचा पर्याय उपलब्ध नाही. यामुळे भाऊबीजच्या दिवशी जवळपास २0 ते २२ बसेस आगारात उभ्या असल्याचे दिसून आले. प्लेट फार्मवर गाड्या उपलब्ध नसल्याने प्रवाश्यांना ताटकळत बसुन त्रास सहन करावा लागला.
डिझेल पंप यांत्रिकी बिघाडामुळे बंद असल्याची सूचना तत्काळ वरिष्ठांना दिली; परंतु दिवाळीच्या सुट्या असल्याने सोमवारपर्यंत पंप सुरू होण्याची शक्यता आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी नजीकच्या आगारामधून डिझेल भरण्याची तात्पुरती व्यवस्था करून आवश्यक मार्गावरील फेर्‍या सुरू ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला असल्याचे मंगरूळपीर आगाराचे सहायक कार्यशाळा अधीक्षक राम चवरे यांनी सांगीतले.

Web Title: Turn off the pump on the third day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.