शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांवर पीक उपटून फेकण्याची पाळी

By admin | Updated: September 19, 2014 23:53 IST

वाशिम जिल्ह्यात पिवळा मोझ्कसह विविध किडींचा प्रादूर्भाव; शेतकरी हवालदील.

वाशिम : जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी झालेल्या एकूण २ लाख ९६ हजार ५१९ हेक्टर क्षेत्रापैकी जवळपास २0 टक्के क्षेत्रावरील पिक आजमितीला किडीने संपल्यात जमा आहे. कोणताही उपाय किड नियंत्रणातच न आल्याने पिक संपल्यात जमा झालेल्या शेतकर्‍यांनी अखेर इतर पिकाला त्या किडींचा धोका पोहचू नये म्हणून किडीने ग्रासलेले शेकडो एकरातील सोयाबीन उपटून फेकण्याचा सपाटा लावला आहे. जिल्ह्यात चालू खरिप हंगामात एकूण ४ लाख ११ हजार ९९४ हेक्टरवर ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, सुर्यफूल, तिळ, सोयाबीन, कपाशी, उस, आदी पिकांची पेरणी करण्यात आली होती. यामध्ये सर्वात जास्त पेरा सोयाबीनचा आहे. २ लाख ९६ हजार ५१९ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली. दूबार, तिबार पेरणीनंतर शेतकर्‍यांना ऑगस्ट व सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे सोयाबीन या नगदी पिकातून चांगले उत्पादन मिळण्याची आशा निर्माण झाली होती. परंतू जिल्हाभरातील शेतकर्‍यांच्या या आशेवर पिवळा मोझ्ॉक, तंबाखुची पाने खाणारी आळी, खोड सड यासह विविध रोगांनी ऑगस्ट अखेर व सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात लक्ष केल्याने आधीच विविध नैसर्गीक आपत्त्यांनी कंबरडे मोडलेल्या शेतकर्‍यांना पीक वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागत आहे. किडीचा सर्वाधिक प्रादूर्भाव रिसोड तालुक्यात व त्यापाठोपाठ मालेगाव तालुक्यातील सोयाबीनवर असून वाशिम, मंगरुळपीर, मानोरा व कारंजा तालुक्यात झाला आहे. सपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेता जिल्ह्यातील २0 टक्के सोयाबीन विविध प्रकारच्या किडींनी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. रिसोड तालुक्यात जवळपास २0 टक्के, मालेगाव तालुक्यात जवळपास १७ टक्के, वाशिम तालुक्यात जवळपास १५ टक्के, मंगरुळपीर तालुक्यात जवळपास १0 टक्के त्यापाठोपाठ कमी अधिक प्रमाणात मानोरा व कारंजा तालुक्यातील सोयाबीन किडींमुळे नष्ट झल्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.