शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

रेशन दुकानातून तूरडाळ गायब 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 11:57 IST

Washim News तूरडाळ मिळणे बंद झाले असून, केवळ गहू व तांदळाचे वाटप पात्र लाभार्थींना केले जात आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :     गत काही महिन्यांपासून रेशन दुकानांमधून तूरडाळ मिळणे बंद झाले असून, केवळ गहू व तांदळाचे वाटप पात्र लाभार्थींना केले जात आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत गोरगरीब लाभार्थींना अत्यल्प दरात अन्नधान्य उपलब्ध करून दिले जाते. लॉकडाऊन काळात उद्योग - व्यवसाय बंद असल्याने केंद्र शासनाने एप्रिल ते नोव्हेंबरदरम्यान प्राधान्यक्रम, अंत्योदयच्या कार्डधारकांना मोफत तांदूळ आणि गहू वितरित केले. दरम्यान, गत काही महिन्यांपासून वरिष्ठांच्या सुचनेनुसार रेशन दुकानांमधून तूरडाळ मिळणे बंद झाले आहे. जिल्ह्यात दोन लाख ७८ हजार १५० शिधापत्रिका असून, यामध्ये अंत्योदय ४८ हजार ९७०, प्राधान्य कुटुंब एक लाख ८१ हजार १०९, एपीएल शेतकरी २३ हजार ८५६ आणि केशरी रेशनकार्ड १४ हजार ७३९, पांढरे कार्ड नऊ हजार ४७६ अशा शिधापत्रिकांचा समावेश आहे.  तूरडाळ मिळत नसल्याने लाभार्थींमधून नाराजीचा सूर उमटत आहे. रेशनवर गहू, तांदूळ मिळतो    रेशन दुकानातून सद्यस्थितीत लाभार्थींना गहू व तांदळाचे वाटप केले जात आहे. फेब्रुवारी महिन्यापासून गव्हाचे प्रमाण ५० टक्के कमी करून त्याऐवजी मका, ज्वारी देण्याचा विचार वरिष्ठ स्तरावर सुरू आहे. रेशनवर केवळ गहू व तांदूळच मिळत असल्याने लाभार्थींमध्ये नाराजीचा सूर आहे. रेशन दुकानातून अन्य अन्नधान्यदेखील वाटप व्हावे, अशी अपेक्षा लाभार्थींमधून व्यक्त केली जात आहे. 

वाशिम जिल्ह्यात एकूण दोन लाख ७८ हजार १५० शिधापत्रिका आहेत. यामध्ये ४८ हजार ९७० पिवळ्या शिधापत्रिका आहेत. रेशन दुकानातून पात्र लाभार्थींना गहू व तांदळाचे वाटप करण्यात येते. वरिष्ठ स्तरावरूनच तूरडाळ वाटप बंद झाले आहे. त्याची अंमलबजावणी जिल्ह्यात केली जात आहे. - सुनील विंचनकर जिल्हा पुरवठा अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिम