शेतातून रस्ता देण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:27 IST2021-06-26T04:27:55+5:302021-06-26T04:27:55+5:30

पेडगाव येथील बंडू भिकाजी वैद्य आणि बाळू भिकाजी वैद्य यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद केले की, बंडू ...

Trying to push through the fields! | शेतातून रस्ता देण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न!

शेतातून रस्ता देण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न!

पेडगाव येथील बंडू भिकाजी वैद्य आणि बाळू भिकाजी वैद्य यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद केले की, बंडू वैद्य आणि बाळू वैद्य हे पेडगाव येथे राहतात. याच गावात गट क्र. १३१/३ मध्ये त्यांच्या मालकीची व वहिवाटीतील ६.२१ हे.आर. शेतजमीन आहे. ही जमीन त्यांनी १९८६ मध्ये विकत घेतली. तेव्हापासून ते ही जमीन त्यांच्या वहिवाटीत आहे. या शेतजमिनीत कधीच व कोणासाठीही रस्ता नव्हता; परंतु बंडू प्रल्हाद इंगोले आणि अरुण शामराव देशमुख व इतर काहींनी कलम ५ मामलतदार कोर्टअ‍ॅक्ट खाली खटला दाखल केला. तो ३० एप्रिल २०२१ रोजी खारीज झाला. त्यावर त्यांनी उपविभागीय अधिकारी मंगरुळपीर यांच्याकडे अपील केले. त्यानुसार ३० जूनरोजी सुनावणी ठेवण्यात आली; परंतु याचदरम्यान तहसीलदारांचे आदेश दाखविल्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी बंडू वैद्य आणि बाळू वैद्य यांना खडसावत ताबडतोब रस्ता खुला करण्यास सांगितले. त्यामुळे उपरोक्त दोन्ही शेतकरी भयग्रस्त झाले असून, याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून न्याय देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Web Title: Trying to push through the fields!