फुले जयंतीदिनी पार पडला आगळावेगळा सत्यशोधक विवाह
By Admin | Updated: April 13, 2017 15:35 IST2017-04-13T15:35:00+5:302017-04-13T15:35:00+5:30
महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंतीदिनी त्यांनी स्थापित केलेल्या सत्यशोधक पद्धतीने येथील एका जोडप्याचा विवाह मंगळवारी पार पडला.

फुले जयंतीदिनी पार पडला आगळावेगळा सत्यशोधक विवाह
चळवळीतील आठ जोडप्यांचा सत्कार, वरबंधू गजानन धामणे यांचा पुढाकार
वाशिम: महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंतीदिनी त्यांनी स्थापित केलेल्या सत्यशोधक पद्धतीने येथील एका जोडप्याचा विवाह मंगळवारी पार पडला. यावेळी सत्यशोधक पद्धतीने विवाह करून चळवळीला वाहून घेतलेल्या आठ जोडप्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वराचे ज्येष्ठ बंधू, सत्यशोधक समाजाचे जिल्हाध्यक्ष गजानन धामणे यांच्या पुढाकाराने उपरोक्त विवाह पार पडला.
येथील काळे फैल परिसरातील दुगार्बाई व विष्णू रामभाऊ सोनुने यांची कन्या पुजा आणि तालुक्यातील सुरकंडी येथील शेवंताबाई व बबन आश्रुजी धामणे रा. सुरकंडी यांचे पुत्र दत्ता यांचा उपरोक्त पद्धतीने विवाह पार पडला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी सत्यशोधक पद्धतीने विवाह करुन या चळवळीला वाहून घेणाऱ्या आठ दाम्पत्यांचा ह्यसत्यशोधक दाम्पत्य गौरवह्ण पुरस्काराने सन्मान करण्यात आला.