ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
By Admin | Updated: January 19, 2015 02:24 IST2015-01-19T02:24:40+5:302015-01-19T02:24:40+5:30
कारंजा तालुक्यातील कोळी फाट्यानजीक अपघात.

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
कारंजा लाड (वाशिम) : भरधाव ट्रकची धडक लागून दुचाकीवरील एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवार, १८ जानेवारी रोजी कारंजा तालुक्यातील कोळी फाट्यानजीक सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.
कारंजा येथील कोळी फाट्याजवळ असलेल्या कोल फॅक्टरीमधून माल घेऊन पुणे येथे जात असलेल्या ट्रक ने विरुद्ध दिशेने येत असलेल्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील जालना जिल्ह्याच्या जाफराबाद येथील खुशालसिंह मोतीसिंह भारद्वाज (३५) या इसमाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर रवि प्रतापमल्ला मिश्रे हा गंभीर जखमी झाला. वृत्त लिहिपर्यंंत या प्रकरणी कारंजा पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नव्हता.