ट्रकच्या धडकेत युवक ठार
By Admin | Updated: January 22, 2015 00:19 IST2015-01-22T00:19:39+5:302015-01-22T00:19:39+5:30
मानोरा तालुक्यातील घटना.
_ns.jpg)
ट्रकच्या धडकेत युवक ठार
मानोरा (जि. वाशिम): ट्रकच्या धडकेत सोमठाणा येथील ३८ वर्षीय युवक जागीच ठार झाल्याची घटना २१ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३0 वाजता येथील जनता बँकेजवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार, येथील गणेश ट्रेडिंग कंपनीच्या एमएच ३0 एल-४१८६ क्रमांकाच्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने सोमठाणा येथील रहिवाशी गजानन रामजी खापरकर याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती पोलीसांना कळताच त्यांनी आठवडी बाजाराचा दिवस असल्याने गजानन खापरकर यांना तत्काळ ग्रामीण रूग्णालयात हलविले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ.नांदे यांनी त्याला मृत धोषित केले. वृत्त लिहेपर्यंत पोलीस कारवाई सुरूच होती.