ट्रकने बालकास चिरडले!
By Admin | Updated: February 28, 2017 01:39 IST2017-02-28T01:39:45+5:302017-02-28T01:39:45+5:30
ऋतिकचा घटनास्थळीच मृत्यू

ट्रकने बालकास चिरडले!
वाशिम, दि. २७- येथून मालेगावच्या दिशेने भरधाव जाणार्या ट्रकखाली चिरडल्या जाऊन १0 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. ही घटना जांभरूण परांडे फाट्यानजिक सोमवार, २७ फेब्रूवारीला सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. याबाबत प्राप्त माहितीनुसार, मध्य प्रदेशमधून सरकी घेऊन येणारा ट्रक जळगावकडे जात होता. दरम्यान, वाशिमपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या जांभरूण परांडे फाट्यानजिक पायदळ जात असलेल्या ऋतिक गोपाल कांबळे (रा. धानोरा मापारी, ता.जि. वाशिम) याला ट्रकचालकाने जबरदस्त धडक दिली. त्यात ऋतिकचा घटनास्थळीच मृत्यू झाला.