ट्रकने चिरडले; बालकाचा मृत्यू!

By Admin | Updated: February 27, 2017 21:53 IST2017-02-27T21:53:27+5:302017-02-27T21:53:27+5:30

येथून मालेगावच्या दिशेने भरधाव वेगात जाणाºया ट्रकखाली चिरखडल्या जावून १० वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. ही घटना जांभरून परांडे फाट्यानजिक

The truck crashed; Child's death! | ट्रकने चिरडले; बालकाचा मृत्यू!

ट्रकने चिरडले; बालकाचा मृत्यू!

>ऑनलाइ लोकमत
वाशिम, दि. 27 - येथून मालेगावच्या दिशेने भरधाव वेगात जाणाºया ट्रकखाली चिरखडल्या जावून १० वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. ही घटना जांभरून परांडे फाट्यानजिक सोमवार, २७ फेब्रूवारीला सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. 
याबाबत प्राप्त माहितीनुसार, मध्यप्रदेशमधून सरकी घेऊन येणारा ट्रक जळगावकडे जात होता. दरम्यान, वाशिमपासून सहा किलोमिटर अंतरावर असलेल्या जांभरून परांडे फाट्यानजिक पायदळ जात असलेल्या ऋतिक गोपाल कांबळे (रा. धानोरा मापारी, ता.जि. वाशिम) याला ट्रकचालकाने जबरदस्त धडक दिली. त्यात ऋतिकचा घटनास्थळीच मृत्यू झाला. 

Web Title: The truck crashed; Child's death!