ट्रक व दुचाकीचा अपघात; एकजण जागीच ठार!
By Admin | Updated: May 18, 2017 19:40 IST2017-05-18T19:40:09+5:302017-05-18T19:40:09+5:30
कारंजा लाड (वाशिम) : कारंजा ते नागपूर हायवे रस्त्यावरील नागठाणा परिसरात मे रोजी पहाटे ५ वाजताच्या सुमारास ट्रक व दुचाकीचा अपघात होवून एकजण ठार झाल्याची घटना घडली.

ट्रक व दुचाकीचा अपघात; एकजण जागीच ठार!
ऑनलाइन लोकमत
कारंजा लाड (वाशिम) : कारंजा ते नागपूर हायवे रस्त्यावरील नागठाणा परिसरात मे रोजी पहाटे ५ वाजताच्या सुमारास ट्रक व दुचाकीचा अपघात होवून एकजण ठार झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रणजीत गोपाल राठोड (रा. बाबरे कॉलनी, कारंजा) हा युवक आपल्या एम एच ४४ ई ३४१८ या क्रमांकाच्या दुचाकीने रिलायन्स पेट्रोलपंपाहून नागपूर हायवे रस्त्याने कारंजाकडे येत होता. याचवेळी मागून येणाऱ्या एम एच ३४ एम ४८० या क्रमांकाच्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात दुचाकी चालक रणजित राठोड हा जागीच ठार झाला. मुतकाचे वडिल गोपिनाथ राठोड यांच्या फिर्यादीवरून ट्रकचालकाविरुद्ध शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.