कापूस घेऊन जाणा-या ट्रकला आग
By Admin | Updated: May 25, 2015 02:34 IST2015-05-25T02:34:57+5:302015-05-25T02:34:57+5:30
लोणार तालुक्यातील घटना.
कापूस घेऊन जाणा-या ट्रकला आग
खळेगाव (जि. बुलडाणा): लोणार तालुक्यातील खळेगाव फाट्यानजीक एका कापूस घेऊन जाणार्या ट्रकला अचानक आग लागल्याची घटना २४ मे रोजी रात्री ९.१५ वाजताच्या सुमारास घडली. अमरावती जिल्ह्यातील मालखेडवरुन एम.एच. 0६ के.५८३१ क्रमांकाच्या ट्रकने कापसाच्या १00 गाठी मुंबईला नेल्या जात होत्या, दरम्यान खळेगाव फाट्यानजीक या ट्रकला अचानक आग लागली. आग लागण्याचे कारण मात्र समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमनच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. हे वृत्त हाती येईपर्यंत अग्निशमन दलाच्या दोन्ही गाड्या आग विझविण्याचे काम करीत होत्या.