वाशिम अर्बंनच्या वतीने राठी यांना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:47 IST2021-08-12T04:47:06+5:302021-08-12T04:47:06+5:30

वाशिम अर्बन बँकेच्या मुख्य कार्यालय व शाखेच्यावतीने मानद अध्यक्ष दिवंगत सुभाष राठी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी ...

Tribute to Rathi on behalf of Washim Urban | वाशिम अर्बंनच्या वतीने राठी यांना श्रद्धांजली

वाशिम अर्बंनच्या वतीने राठी यांना श्रद्धांजली

वाशिम अर्बन बँकेच्या मुख्य कार्यालय व शाखेच्यावतीने मानद अध्यक्ष दिवंगत सुभाष राठी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी बँकेचे संचालक विजयकुमार दागडीया, प्रकाश भांदुर्गे, कायद जोहर शफाकत हुसेन, पुरुषोत्तम चरखा, राजेश सिसोदिया, विपीन बाकलीवाल, विशाल पाटणी, ॲड.चंदेल, मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाल खंडेलवाल, कर्मचारी प्रतिनिधी तेजराव वानखेडे, समाजसेवक वसंतराव धाडवे, ॲड. विनोद खंडेलवाल, विशाल खंडेलवाल, निलेश सोमाणी, रुपेश लढ्ढा, दिपक गंगवाल समवेत संपूर्ण बँकेचे कर्मचारीवृंद उपस्थित होता. यावेळी सर्वांनी दोन मिनिट मौन पाळून त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली. मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाल खंडेलवाल व तेजराव वानखेडे यांनी आपल्या मनोगतातुन श्रद्धेय सुभाष राठी यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. संचालन सहायक सरव्यवस्थापक श्रीराम करवा यांनी केले. (वा.प्र.)

Web Title: Tribute to Rathi on behalf of Washim Urban