स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पथनाट्यातून शहिदांना मानवंदना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:44 IST2021-08-27T04:44:57+5:302021-08-27T04:44:57+5:30
यंदा देशाने स्वातंत्राच्या अमृत महोत्सवी वर्षात पदर्पण केले असून, भावी पीढीला स्वातंत्र चळवळीतील महापुरूषांच्या कार्याची माहिती व्हावी या उद्देशाने ...

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पथनाट्यातून शहिदांना मानवंदना
यंदा देशाने स्वातंत्राच्या अमृत महोत्सवी वर्षात पदर्पण केले असून, भावी पीढीला स्वातंत्र चळवळीतील महापुरूषांच्या कार्याची माहिती व्हावी या उद्देशाने आझादी का अमृत महोत्सव हा उपक्रम राबविला जात आहे. या अंतर्गत भारतीय स्वातंत्र्याच्या, लोकशाहीच्या, एकतेच्या व विकासाच्या गौरवशाली ७५ वर्षातील घडामोडींची व घटनांची माहीती पथनाट्यातुन देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार २६ ऑगस्ट रोजी दुपारी कामरगाव येथील आठवडी बाजारात माता सावीत्रीबाई फुले बहुउदेशीय कला व सांस्कृतिक मंडळ पिलकवाडी ता. अकोट, जिल्हा अकोला यांनी पथनाट्य सादर केले. या पथनाट्यातुन शहिदांना मानवंदना देउन स्वातंत्र्य चळवळीतील महापुरूषांच्या कार्य व विचारांबाबत जनजागृती करण्यात आली. या पथनाट्यात सतोंष दामोदर यांनी स्त्री कलाकाराची भुमिका साकारली. जग्गनाथ तायडे यांनी ढोलकी व संघपाल दामोदर यांनी हार्माेनियमवर त्यांना साथ दिली. गुणवंत बांगर यांनी टाळवादन केले. शिवाय तेजराव वाकोडे व भिमराव तायडे यांनी सहकलाकार म्हणून भुमिका निभावल्या. श्रीरंत्न अंदुरकर यांनी सूत्रसंचालन केले. पथनाट्यास स्थानिक सरपंच साहेबराव तुमसरे,उपसंरपंच रहेमत खान यांच्यासह ग्रा.पं. पदाधिकारी व ग्रामस्थांची उपस्थिती होती.