पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:41 IST2021-02-16T04:41:41+5:302021-02-16T04:41:41+5:30

पुलवामा येथे १४ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे १७ जवान शहीद झाले होते. या घटनेतील शहीद सैनिकांना ...

Tribute to the martyrs of the Pulwama terror attack | पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली

पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली

पुलवामा येथे १४ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे १७ जवान शहीद झाले होते. या घटनेतील शहीद सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम शिरपूर येथील देशमुख वेटाळात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला माजी सैनिक नंदकिशोर देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ग्रामपंचायत सदस्य पप्पू देशमुख, वसंतराव देशमुख, अमोल देशमुख, विलास देशमुख, सुखदेव देशमुख, संदीप देशमुख, किशोर प्रकाशराव देशमुख, अमर देशमुख, मदन जाधव, अतिश जाधव, गजानन देशमुख, गोपाल वाढे, किशोर जाधव, माधवराव देशमुख, शिवाजी देशमुख, बंडू देशमुख, बाळू देशमुख, अविनाश देशमुख, वैभव देशमुख, किशोर देशमुख, अनंता देशमुख, छोटू देशमुख, रमेश देशमुख, संतोष देशमुख, सुरेश देशमुख, ओम देशमुख, निलेश देशमुख, जयंत देशमुख, योगेश देशमुख, गणेश देशमुख, अजाबराव देशमुख, यांच्यासह येथील नागरिकांनी मेणबत्ती प्रज्ज्वलित करून शहीद सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली. कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीत गीत घेण्यात आले.

Web Title: Tribute to the martyrs of the Pulwama terror attack