पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:42 IST2021-02-16T04:42:14+5:302021-02-16T04:42:14+5:30
शहरातील शनी मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थित युवकांनी दीप प्रज्वलन करून वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. दरवर्षी १४ ...

पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली
शहरातील शनी मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थित युवकांनी दीप प्रज्वलन करून वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. दरवर्षी १४ फेब्रुवारी सकल नेवी समाजाकडून पुलवामा येथे शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जाते. यंदाही हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमास हेमंत फुलाड, प्रसाद देशमुख आणि वाशिम जिल्हा विस्तारक अ.भा.वि.प. कौस्तुभ मोहदुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचलन अजिंक्य जवळेकर याने केले. कौस्तुभ मोहदुरकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला, तसेच कार्यक्रमाचा समारोप मंगेश मेटकर यांनी केला.
कार्यक्रमात सकल नेवी समाज आणि दत्त मंदिर मित्रमंडळ येथील युवक प्रचंड संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनात शुभम राऊळ, आदर्श वैद्य, दर्शन वैद्य, राहुल देशमुख, निलय बोन्ते, आशिष वैद्य, शुभम गंधक, वैभव राऊळ, युवकांनी महत्त्वाची भूमिका निभावली.